रोलेट गेम बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:56+5:302021-08-28T04:17:56+5:30
चांदवड : ऑनलाइन रोलेट (बिंगो) फेक जुगार चालविणारे यांच्यावर मोक्कान्वये कार्यवाही व्हावी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ...

रोलेट गेम बंद करण्याची मागणी
चांदवड : ऑनलाइन रोलेट (बिंगो) फेक जुगार चालविणारे यांच्यावर मोक्कान्वये कार्यवाही व्हावी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, याबाबतचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांना देण्यात आले. शिष्टमंडळात नगरसेवक ॲड.नवनाथ आहेर, अल्ताफ तांबोळी, अभिजीत ठाकरे, ऋषिकेश सोनवणो, रोनक कबाडे, अजिंक्य शेळके, ओंकार तासकर, सत्यम विसपुते, शिवम सादडे आदी सहभागी झाले होते. निवेदनात नाशिक जिल्ह्यात व शहरात ऑनलाइन रोलेट बिंगो फेक जुगार चालविण्यात येते. या ऑनलाइन जुगाराची ॲपच्या माध्यमातून हजारो युवकांना आर्थिक व मानसिक, तसेच गुंडांच्या माध्यमातून शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. काही भागांत आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे. रोलेट चालणाऱ्या एजंटची जर व्यवस्थित चौकशी केली, तर जिल्ह्यातील मोठे गुन्हेगारीची साखळी बाहेर येईल, तरी या जुगाराची चौकशी करून हा खेळ बंद करण्यात यावा, भास्करे यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावे व चालणारे धंदे त्यांच्यावर कारवाई व्हावी, कार्यवाही न झाल्यास येत्या पंधरा दिवसांत जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.