कमकोच्या कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:30 IST2018-08-12T23:41:55+5:302018-08-13T00:30:55+5:30
दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेतील कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करावे, नूतनीकरण कोटेशन व निविदा प्रसिद्ध करावी, पाच संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याचा खुलासा करावा व पोटनिवडणूक का घेतली नाही, असा प्रश्न कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. दरम्यान, वैयक्तिक द्वेष व स्वार्थापोटी सभासदांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप कमको अध्यक्ष प्रवीण संचेती यांच्यासह संचालक मंडळाने केला आहे.

कमकोच्या कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करण्याची मागणी
कळवण : दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेतील कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करावे, नूतनीकरण कोटेशन व निविदा प्रसिद्ध करावी, पाच संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याचा खुलासा करावा व पोटनिवडणूक का घेतली नाही, असा प्रश्न कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. दरम्यान, वैयक्तिक द्वेष व स्वार्थापोटी सभासदांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप कमको अध्यक्ष प्रवीण संचेती यांच्यासह संचालक मंडळाने केला आहे.
जाधव यांचे प्रसिध्दपत्रक कळवण शहरातील सभासद व व्यावसायिक बांधवांना वाटण्यात येत असल्याने हा विषय सध्या शहरात चर्चेचा ठरला आहे.
कमको बॅँकसंदर्भात माजी संचालक कैलास जाधव यांनी १९ जुलै २०१८ रोजी जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कळवण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दि कळवण मर्चंट को- आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाने सन २०१५-१६ मध्ये कार्यक्षेत्राबाहेरील सभासद करून कर्जपुरवठा केला असल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करावे, कमकोच्या पाच संचालकांनी सन २०१७ मध्ये राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घ्यावी व पोटनिवडणुकीनंतर बॅँकेचा नूतनीकरण सोहळा घ्यावा, संचालक मंडळाच्या नातेवाइकांना कर्जवाटप करण्यात आले आहे त्या प्रकरणांचा लेखापरीक्षणाची नियुक्ती करून चौकशी करावी. कमको बॅँकेच्या नूतनीकरण कामाची चौकशी
करावी, आदी पाच मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, कमको पदाधिकारी व संचालक मंडळाने लेखी तक्र ारींवर चर्चा करण्यासाठी जाधव यांना आमंत्रित केले होते. परंतु चर्चेचा प्रयत्न अयशस्वी झाला.
कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी बॅकेकडे केलेली मागणी व प्रसिध्द केलेल्या मागणीमध्ये तफावत असून बॅँकेने तक्रारी अर्जानुसार मागणी केलेल्या मुद्द्याची तपशीलवार माहिती बॅँकेच्या प्रशासनाने लेखी स्वरु पात व टपालाद्वारे जाधव यांना दिली. मात्र त्यांनी ती माहिती स्वीकारण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट कमकोचे अध्यक्ष प्रवीण संचेती व संचालक मंडळाने केला आहे.
बॅँकेचा आलेख उंचावणारा : संचेती
कैलास जाधव यांच्या पत्रकामुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जाधव यांनी बॅँकेकडे लेखी स्वरु पात केलेल्या तक्र ारी अर्जातील ५ मागण्या व प्रसिध्दपत्रकाद्वारे केलेल्या १२ मागण्या तथ्यहीन असून काही मुद्दे हे र्बंकेच्या कामकाज व भविष्यकालीन धोरणांचा भाग आहे. असे अध्यक्ष प्रवीण संचेती यांनी म्हटले आहे. मागण्यामधील मुद्दे बॅँकेच्या हिताचे असतील तर त्या मुद्याचा निर्णय संचालक मंडळ व प्रशासन निश्चित घेऊन अंमलबजावणी करेल. बॅँकेचे कामकाज पारदर्शी असून, आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावणारा आहे हे सभासदांना ते ज्ञात आहे. चौफेर होत असलेली प्रगती बघवली जात नसल्याने सभासदांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे, असे अध्यक्ष प्रवीण संचेती व संचालक मंडळाने सांगितले.