सिन्नर, संगमनेर आगारातून ग्रामीण भागात बसेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:12+5:302021-02-05T05:47:12+5:30
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथून तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व चाकरमाने तालुक्याच्या ठिकाणी ये -जा करतात. तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी ...

सिन्नर, संगमनेर आगारातून ग्रामीण भागात बसेसची मागणी
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथून तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व चाकरमाने तालुक्याच्या ठिकाणी ये -जा करतात. तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी संगमनेर, लोणी, सिन्नर व दोडी येथे विद्यार्थी जातात. लॉकडाऊनमुळे बसफेऱ्या बंद केल्या होत्या, तर अनलॉकनंतर महत्त्वाच्या ठिकाणच्या बसफेऱ्या कमी प्रमाणात सुरू झाल्या, मात्र ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद होत्या. दरम्यान काही अडचण येत नव्हती, परंतु शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी शाळेत पायी, तर काही सायकलने जात आहेत. ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सिन्नर व संगमनेर आगारातून ग्रामीण भागात सुटणाऱ्या बसेस पूर्ववत सुरू करण्याची मागणी सभापती बर्के यांच्यासह विद्यार्थी, पालक करीत आहेत.
इन्फो...
नाशिक - पुणे महामार्गावरील तसेच सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून नांदूरशिंगोटे गावाची ओळख आहे. येथील स्थानकात दररोज शेकडो बसेस ये - जा करतात. परंतु कोरोनाकाळात सिन्नर आगारातील काही बसेस बंद होत्या. अलीकडच्या काळात काही बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु मुक्कामी बसेस अद्यापही सुरू न झाल्याने ग्रामीण भागात प्रवाशांची अडचण होत आहे. ग्रामीण भागातील बसेस पूर्ववत सुरू झाल्यास परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल. सिन्नर ते संगमनेर बस सुरू झाल्यास नांदूरशिंगोटे व दोडी परिसरातील प्रवाशांच्या अडचणी दूर होणार आहेत.