मुखेड फाट्यावर गतिरोधकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:58 IST2020-09-21T22:47:26+5:302020-09-22T00:58:28+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिकानगर येथील मुखेड फाट्यावर सतत अपघात होतात, शिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्कल अथवा गतिरोधक बसवावे, असे निवेदन देऊनही व वारंवार पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याने शिर्डी-सुरत महामार्गावर रास्ता रोको करून निषेध करणार असल्याचे पत्र आदिवासी शक्ती सेनेने बांधकाम विभाग अभियंता, नाशिक, पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर व पोलीस ठाण्याचे अंमलदार पंडित वाघ, योगेश बुरगुले व मिथुन घोडके यांना देऊन केले आहे.

पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार पंडित वाघ यांना निवेदन देताना दत्तू झनकर, तानाजी पवार, विष्णू गांगुर्डे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिकानगर येथील मुखेड फाट्यावर सतत अपघात होतात, शिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्कल अथवा गतिरोधक बसवावे, असे निवेदन देऊनही व वारंवार पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याने शिर्डी-सुरत महामार्गावर रास्ता रोको करून निषेध करणार असल्याचे पत्र आदिवासी शक्ती सेनेने बांधकाम विभाग अभियंता, नाशिक, पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर व पोलीस ठाण्याचे अंमलदार पंडित वाघ, योगेश बुरगुले व मिथुन घोडके यांना देऊन केले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था बिगडल्यास यास सर्वस्वी जबाबदार आजपर्यंत ज्यांना पत्रव्यवहार केले आहे ते विभाग जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष दत्तू झनकर, रामकृष्ण कंक, विष्णू गांगुर्डे, सरचिटणीस तानाजी पवार, ज्ञानेश्वर जाधव, शंकर शेवरे, संगीता कराटे, विठाबाई पवार, मनोज पवार, ऋषिकेश मोगल आदींच्या सह्या निवेदनावर आहे.बांधकामाकडे दुर्लक्षमागील महिन्यातील १७ आॅगस्ट व १७ सप्टेंबर रोजी सतत अपघात होत असलेल्या मुखेड फाट्यावर गतिरोधक अथवा सर्कल करा, अशी मागणी करूनही बांधकाम विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने आदिवासी शक्ती सेनेतर्फे रास्ता रोको करून निषेध करण्यात येणार आहे. यासंबंधितचे निवेदन बांधकाम विभागासह पिंपळगाव ग्रामपंचायत व पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे.