परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 09:54 PM2020-07-05T21:54:15+5:302020-07-05T21:57:37+5:30

चांदवड : चांदवड शहर व ग्रामीण भागातील अनेक मुले सरळसेवा, पोलीस भरतीसाठी अभ्यास करीत आहेत. मात्र, परीक्षेबाबत कोणत्याची सूचना अथवा वेळापत्रक न आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नोकरी कधी लागणार, याची चिंता सतावत आहे.

Demand for announcement of examination schedule | परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देसरळसेवा परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : चांदवड शहर व ग्रामीण भागातील अनेक मुले सरळसेवा, पोलीस भरतीसाठी अभ्यास करीत आहेत. मात्र, परीक्षेबाबत कोणत्याची सूचना अथवा वेळापत्रक न आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नोकरी कधी लागणार, याची चिंता सतावत आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात म्हणजेक्ग जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ पर्यंत महापोर्टल या शासकीय भरतीच्या पोर्टलवर विद्यर्ा्थ्यांनी जिल्हा परिषद, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, एमआरडीसी अशा विभागांच्या भरतीसाठी फॉर्म भरलेले होते.
दीड वर्ष उलटून गेले तरी परीक्षा होत नसल्याने परीक्षार्थी चिंताग्रस्त झालेले असून त्यांना मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. तरी त्या भरतीबाबत वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत. तसेच काही उमेदवार पोलीस भरती २०१८ ला प्रतीक्षा यादीत आहेत. त्यांना सध्याच्या कोविड परिस्थितीत सेवेची संधी मिळावी अशी मागणी केली आहे.
परिक्षार्थी शिष्टमंडळाने चांदवड आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर उदय वायकोळे, दत्तात्रय पवार, गौरव पवार, किरण गायकवाड, राकेश गांगुर्डे, योगेश बोराडे, भारत खंदारे, दिनेश बिरार, योगेश राखुंडे, ऋृषिकेश पगार, सुनील निकम आदींसह तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.परीक्षार्थींची बाजू मांडण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे महापरीक्षा पोर्टल मार्फत सन २०१९ मध्ये अर्ज भरलेल्या सरळसेवा परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच सन २०१८ मधील पोलीस भरती वेटींग लिस्ट उमेदवारांना कोविड परिस्थितीत सेवेची संधी द्यावी अशी मागणीनिवेदनाद्वारे केल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Demand for announcement of examination schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.