अंगणवाडी बांधकाम चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:00 IST2019-09-27T00:59:33+5:302019-09-27T01:00:40+5:30
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे अंगणवाडीच्या इमारतीचे काम सुरू असून, ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख गोºहे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी सदर कामदेखील बंद पाडले आहे.

मोडाळे येथे अंगणवाडीचे काम बंद करताना गोरख गोºहे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे अंगणवाडीच्या इमारतीचे काम सुरू असून, ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख गोºहे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी सदर कामदेखील बंद पाडले आहे.
गोºहे यांच्यासह समाधान बोडके, अंकुश शेंडगे, गोरख आहेर, गोरख बोडके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामाचे ई-टेंडर न करताच कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सरपंचांनाही या कामाविषयी काही माहिती नाही. पंचायत समिती विभागांतर्गत मंजूर या कामात जवळपास आठ लाखांचा निधी मिळाला आहे. काम करताना जमीन खोदून पाच ते सहा फूट खड्डे घेणे आवश्यक असताना या ठिकाणी फक्त दोन ते तीनच फूट खड्डे घेतले आहेत. तसेच कॉलमला स्टीलही कमी प्रमाणात वापरले आहे.