शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

‘त्या’ कवीवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 1:34 AM

पेठ : मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या एका कवितेत आदिवासी महिलांबाबत अश्लील शब्द वापरल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून, संबंधित कवी व मुंबई विद्यापीठ प्रशासनावर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.आदिवासी विकासपरिषद व महादेव कोळी महासंघ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना ...

पेठ : मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या एका कवितेत आदिवासी महिलांबाबत अश्लील शब्द वापरल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून, संबंधित कवी व मुंबई विद्यापीठ प्रशासनावर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.आदिवासी विकासपरिषद व महादेव कोळी महासंघ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे , कवी दिनकर मनावर यांच्या ‘पाणी कसं असतं’ या कवीतेत पाण्याची तुलना आदिवासी मुलींच्या शरीराशी करण्यात आली असून, त्यात अश्लील शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कवितेचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमातही करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित कवी व मुंबई विद्यापीठ प्रशासनावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर नगराध्यक्ष मनोज घोंगे, विशाल जाधव, छगन चारोस्कर, हरीदास भुसारे, हेमराज धुम, जीवन जाधव, अरूण राऊत, विजय देशमुख हेमंत हलकंदर आदींच्या सह्या आहेत.विद्यापीठावर धडकणारया कवितेच्या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या महिला शाखेतर्फे ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या चार जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर शनिवार दि. २९ रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी मुंबई विद्यापीठावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे बाळाराम भोईर व विजय जाधव यांनी सांगितले.आज इगतपुरीत मोर्चा‘पाणी कसं असतं’ ही कविता पाठ्यपुस्तकातून वगळण्यासाठी तसेच संबंधित कवी व मुंबई विद्यापीठावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवार, दि. २९ रोजी इगतपुरीत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी कळविले आहे.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ