नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:42 IST2018-12-19T16:41:12+5:302018-12-19T16:42:06+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील नायलॉन मांजा विक्र ी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून या संदर्भात विद्यार्थी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलिस अधिकाºयांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.

पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन येथे नायलॉन मांजा विक्र ी करणाºयांवर कारवाई करण्यात यावी, या संदर्भात निवेदन देताना महाराष्टÑनवनिर्माण सेनेचेपदाधिकारी व सदस्य.
पिंपळगाव बसवंत : येथील नायलॉन मांजा विक्र ी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून या संदर्भात विद्यार्थी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलिस अधिकाºयांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.
पिंपळगाव बसवंत येथे सर्रासपणे नायलॉन मांजा विक्र ी होत असुन दरवर्षी यामुळे अनेक पक्षी तसेच नागरीकांना त्रास सोसावे लागतात. या नायलॉन मांज्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरीता पोलीसांनी तात्काळ दखल घेत कारवाई करावी असी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याला निवेदन देऊन करण्यात आली. ही कारवाई केवळ कागदापत्रक्ष परहाता प्रत्यक्षात आणि कडक स्वरुपात करावी असे यावेळी सांगण्यात आले.
निवेदनावर महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गिरीश कसबे, मनसे शहरप्रमुख संजय मोरे, राजेंद्र भवर, लखन कोपरे, उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शेलार, निलेश सोनवणे, इम्रान पटेल, अजिंक्य मोरे, पवन सोनवणे, प्रशांत कोरडे, संग्राम दाभाडे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.