उपअभियंत्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:10 IST2019-11-21T00:10:13+5:302019-11-21T00:10:30+5:30
जेलरोड येथील महावितरणचे उपअभियंता हे ग्राहकांशी करत असलेल्या गैरवर्तणुकीबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उपअभियंत्यावर कारवाईची मागणी
नाशिकरोड : जेलरोड येथील महावितरणचे उपअभियंता हे ग्राहकांशी करत असलेल्या गैरवर्तणुकीबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांना भाजप नाशिकरोड मंडलातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरणचे जेलरोड येथील उपअभियंता योगेश आहेर हे वीज ग्राहकांशी योग्यप्रकारे संवाद साधत नाहीत. ग्राहक तक्रारी घेऊन गेल्यावर मुंबई कार्यालयात, ऊर्जा मंत्र्याकडे, मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करा, अशी चुकीची उत्तरे देऊन ग्राहकांशी गैरवर्तणूक करतात. त्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात व योग्य ती कारवाई करावी. तसेच थकीत देयक असलेल्या ग्राहकांची वीज जोडणी नोटीस दिल्याशिवाय बंद करू नये. वीज देयकामध्ये मुदतीत वीज देयक भरले नाही तर आपण दंड व आकारणी करतात. अशी दुहेरी दंड आकारणी करू नये आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.