अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:31 IST2020-08-06T22:14:21+5:302020-08-07T00:31:49+5:30
देवळा : समाजमाध्यमांमध्ये कोरोनाविषयी चुकीचे संदेश पसरवून देवळा नगरपंचायतीची बदनामी करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर व इतर नगरसेवकांनी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना दिले आहे.

अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचे निवेदन देताना ज्योत्स्रा आहेर व नगरसेवक.
देवळा : समाजमाध्यमांमध्ये कोरोनाविषयी चुकीचे संदेश पसरवून देवळा नगरपंचायतीची बदनामी करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर व इतर नगरसेवकांनी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देवळा शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या वाढत असून, त्यात दररोज भर पडत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपंचायत प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र अशा परिस्थितीत समाजमाध्यमावर कोरोनासंदर्भात जनतेची दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळे चुकीची माहिती पसरविणाºयां विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अतुल पवार, गटनेते जितेंद्र आहेर, अशोक आहेर, लक्ष्मीकांत आहेर, प्रदीप आहेर, रोशन अलिटकर, शीला आहेर, सिंधूबाई आहेर, सुनंदा आहेर आदींच्या स्वाक्षºया आहेत.