सटाणा : तालुक्यातील बिजोरसे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर नामपूर जिल्हा परिषद सदस्य दबाव आणून राजकारण करीत असल्याची तक्र ार बिजोरसे ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. बिजोरसे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक गावाच्या विकासासाठी प्रयत्न असतांना नामपूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य कान्हू गायकवाड व त्यांच्या हस्तकांच्या दबावतंत्रामुळे बिजोरसे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसत असल्याची लेखी तक्र ार बिजोरसे ग्रामस्थांनी केल्याने खळबळ उडाली आहे.ग्रामपंचायतीचे कामकाज अत्यंत सुरळीत असतांनादेखील बाहेरगावी राहणाºया दोन-चार व्यक्ती गावाच्या विकासकामांमध्ये ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.नामपूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य कान्हू गायकवाड यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत अखत्यारीतील विधायक कामांना ब्रेक लागत असून सदर लोकांनी ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांना हाताशी धरल्यामुळे गावात विधायक कामे होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.बिजोरसे ग्रामपंचायतीचे सरपंच हे आदिवासी असल्यामुळे त्यांच्यावर संबंधितांकडून दबावतंत्र वापरले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मागील आठवड्यात आदिवासी वस्तीत सौर उर्जेचे दिवे बसविण्यापासून ग्रामसेवक यांना कोणी रोखले यांची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी सहाय्यक गटविकास अधिकारी नितीन देशमुख यांच्याकडे केली आहे. निवेदनावर सरपंच बाळकृष्ण पवार, सयाजी पाटील, केदा मोरे, सुरेश काकडे, भाऊसाहेब काकडे, शरद काकडे, कैलास काकडे, शामराव मोरे, शरद काकडे, कडू काकडे, नारायण मोरे, राजेंद्र मोरे, कैलास मोरे, प्रशांत मोरे, नारायण पवार, भगवान गायकवाड, केदा काकडे आदींच्या सह्या आहेत.
विकास कामांना खीळ घालणाऱ्या सदस्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:34 IST
सटाणा : तालुक्यातील बिजोरसे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर नामपूर जिल्हा परिषद सदस्य दबाव आणून राजकारण करीत असल्याची तक्र ार बिजोरसे ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांकडे केली आहे.
विकास कामांना खीळ घालणाऱ्या सदस्यावर कारवाईची मागणी
ठळक मुद्देसटाणा : बिजोरसे ग्रामस्थांची गटविकास अधिकाºयांकडे तक्रार