सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यांना खते देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:01 IST2020-08-07T21:55:27+5:302020-08-08T01:01:38+5:30
बाजारात युरिया व इतर खते मुबलक प्रमाणात मिळत नाही. काही दुकानदार, व्यापारी अडवणूक करून चढ्या दराने खतांची विक्री करीत असल्याची तक्रार प्रहार पक्षाने तहसीलदारांकडे केली आहे.

सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया, खते मुबलक व योग्य दरात मिळावेत या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना देताना प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे. समवेत शेतकरी.
सिन्नर : बाजारात युरिया व इतर खते मुबलक प्रमाणात मिळत नाही. काही दुकानदार, व्यापारी अडवणूक करून चढ्या दराने खतांची विक्री करीत असल्याची तक्रार प्रहार पक्षाने तहसीलदारांकडे केली आहे.
कर्जबाजारी शेतकरी मोलामहागाची बियाणे खरेदी करून मशागतीसह पिकांची लागवड करत आहे, मात्र खतांचा तुटवडा असल्याचे पिके धोक्यात आली आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. सर्व बाजूंनी शेतकरी पेचात सापडला आहे. शासनाने शेतकºयांना मुबलक प्रमाणात व योग्य दरात युरियासह इतर खते उपलब्ध करून द्यावीत. काळाबाजार व बोगस बियाणे विक्री करणाºयांचा बंदोबस्त करावा, या मागण्यांसाठी प्रहार तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांची भेट घेऊन शेतकºयांच्या शिष्टमंडळाने आपल्या व्यथा मांडल्या. यावळी तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह दौलत धनगर, संदीप लोंढे, अर्जुन घोरपडे, सुनील जगताप, खंडेराव सांगळे, नितीन पवार, शेतकरी संपत खुळे, रामजी बोंबले उपस्थित होते.