आदिवासी भागात शिक्षणाचा बोजवारा : शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईचे संकेत
By Admin | Updated: January 24, 2016 22:37 IST2016-01-24T22:23:54+5:302016-01-24T22:37:52+5:30
केवळ तीन विद्यार्थ्यांना दोन शिक्षक

आदिवासी भागात शिक्षणाचा बोजवारा : शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईचे संकेत
मनोज देवरे ल्ल कळवण
कळवण : तालुक्यातील पिंपळे (सावरपाडा ) येथील शाळेत तीन विद्यार्थ्यांना दोन शिक्षक शिकवत असल्याची बाब समोर आली आहे. तीन विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थ्याचे नाव पिंपळे बु।। आणि सावरपाडा या दोन्ही शाळेत असून, एका विद्यार्थ्याचे वय चार वर्षे आहे. शालेय नियमात तो बसत नसल्याने केवळ एका विद्यार्थ्याला दोन शिक्षक शिकवत असल्याचे उघड झाले आहे. शिक्षण विभागाच्या या कारभाराला एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.
एका विद्यार्थ्याला दोन शिक्षक शिकवणाऱ्या पिंपळे (सावरपाडा) येथील एका प्राथमिक शिक्षकाची कारकीर्द वादग्रस्त आणि मनमानी कारभाराची असून, सन २०१४ पासून आजपर्यंत कारणे दाखवा नोटीस, मुख्याध्यापक यांचा अहवाल, ग्रामस्थांचा तक्रारी अर्ज, विस्तार अधिकारी यांचा चौकशी अहवाल, केंद्रप्रमुख यांचा अहवाल तसेच पंचायत समितीचा ठराव व गटशिक्षणाधिकारी यांचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दाखल करूनदेखील संबंधित प्राथमिक शिक्षकावर कारवाई करण्यास शिक्षण विभाग धजावत नसल्याने कळवण पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींसह आजी-माजी पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्यासमोर नाराजी बोलून दाखवल्याने कळवण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून, संबंधित वादग्रस्त शिक्षकावर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिले आहेत. याबाबत कळवण पंचायत समिती शिक्षण विभाग काय भूमिका घेते याकडे आता लक्ष लागले आहे.
कळवण तालुक्यातील आदिवासी भागातील पिंपळे बु।। (सावरपाडा) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या शालेय कामकाजातील अनियमितता, विस्तार अधिकाऱ्यांशी अरेरावी, विना परवानगी गैरहजर राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि विद्यार्थ्यांची ढासळलेली गुणवत्ता, अद्ययावत अभिलेख आढळून न येणे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अनियमित सभा, शालेय पोषण आहार अभिलेख आदि गंभीर बाबींबाबत शेरेपुस्तकात नोंद करूनही संबंधित शिक्षकाच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्याने पंचायत समितीच्या सभेत ठराव करून प्रशासकीय कारवाई करण्याचा ठराव करून निलंबन करण्याचा ठराव गटविकास अधिकाऱ्यांमार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे का प्रस्तावित करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा मागवूनदेखील संबंधित प्राथमिक शिक्षकाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याने या शिक्षकावर शिक्षण विभाग एवढा मेहरबान का, असा सवाल पिंपळे येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाच्या या कार्यपद्धतीवर ग्यानदेव बहिरम, हिरामण भोये, मोतीलाल भोये, दौलत पवार, उत्तम भोये, सुदाम भोये, नितीन भोये, राजाराम पवार, बाळू बहिरम, पंडित बहिरम, सोमनाथ चौधरी, सुदाम बर्डे, प्रकाश ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
,जिल्हा परिषदेकडे तक्र ार नोंदविल्यानंतर शिक्षकाच्या कामकाजबाबत पंचायत समतिी आण िशिक्षण विभागाकडून गेल्या सात मिहन्यापासून केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जात आहे ,संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात पंचायत समतिी आण िजिल्हा परिषद शिक्षण विभाग अपयशी ठरल्याने संबंधित शिक्षकाच्या दादागिरी आण िमनमानीचा पाढा ग्रामस्थांनी आज पंचायत समतिीमध्ये वाचल्याने शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे,