शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पिकांच्या नुकसानभरपाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:25 IST

परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे.

एकलहरे : परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने पिके सडून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अक्षरश: पाण्यात गेला. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पाण्यात सडल्यामुळे पशुधनासाठी लागणाºया चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने सातत्य ठेवले. शेवटी शेवटी तर परतीच्या पावसाने कहरच केला. त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. ऐन काढणी, कापणीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचून पिके वाया गेली, तर काही ठिकाणी सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांना कोंब फुटले. खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीन पिकाची सर्वत्र नासाडी झाली. शेतातून गुडघाभर पाणी साचल्याने पिके सडून दुर्गंधी पसरली. त्यामुळे उत्पादन खर्च अक्षरश: पाण्यात गेला. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पाण्यात सडल्यामुळे पशुधनासाठी लागणाºया चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, कळमकरवाडी, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, नांदूर, मानूर, दसक, पंचक, गंगावाडी या परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहायक, सरपंच, उपसरपंच यांनी केले असले तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे.लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे घडकूज, मण्यांना तडा जाणे यांबरोबरच डावणी व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने वारंवार महागडी फवारणी करावी लागते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. कोवळे घड कुजल्यामुळे अनेक ठिकाणी छाटणी करून अनावश्यक भाग काढून टाकण्यात येत आहे.द्राक्ष पीक चार ते पाच महिन्यांचे असते. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये द्राक्ष छाटणीला येतात. पावसामुळे फुलोरा, मणी धरणे ते छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात द्राक्ष बागांना नुकसानीचा सामना करावा लागतो, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगतात.द्राक्ष उत्पादकांनी ढगाळ वातावरणात द्राक्षबागांची विशेष काळजी घ्यावी. फुलोरा व त्यापुढे आलेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाºया दव, धुक्यामुळे भुरी वाढण्याची शक्यता असते. व्यवस्थित नियोजन करून आत्ताच भुरीचे नियंत्रण केल्यास पुढे जास्त फवारणीची गरज पडणार नाही. सध्या पाऊस थांबलेला असल्याने जमिनीमध्ये वापसा तयार होऊन मुळ्या चांगल्या वाढू शकतात. भुरी, डाउनी, थ्रिप्स, फळकुज यांसारख्या रोगांसाठी बुरशीनाशके, कीटकनाशके फवारणी वेळेवर करावी. आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा फवारणीसाठी वापर झाल्यास भुरीचे चांगले नियंत्रण होईल. त्यामुळे घड जिरणे, कुजणे या समस्याही सुटतील. शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने द्राक्षबागांची निगा राखल्यास फायदा होईल.- रणजित आंधळे, सहायक कृषी अधिकारी, जाखोरी विभागजाखोरी परिसरातील व सजातील जवळपास सर्वच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वास कळमकर, सरपंच सुनीता कळमकर, उपसरपंच अशोक धात्रक यांच्या सहकार्याने झाले आहेत. तसा अहवाल पाठविण्यात आला आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी कृषी खात्याच्या अधिकाºयांकडून मार्गदर्शन घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.- उत्कर्ष पाटील, ग्रामसेवक, जाखोरी

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार