नाशिकमध्ये साजरा होणार डिजेमुक्त शिवजन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:56 IST2018-02-06T11:53:50+5:302018-02-06T11:56:51+5:30
देणगी जमा न करण्याचा निर्णय

नाशिकमध्ये साजरा होणार डिजेमुक्त शिवजन्मोत्सव
नाशिक : सकल मराठा समाज शिवजन्मोत्सव समितीची बैठक दिंडोरी रोडवरील कच्छी लोहाणा मंगल कार्यालयात पार पडली. शिवजन्मोत्सवाच्या नावाखाली देणग्या वसूल करू नये, तसेच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शिवजन्मोत्सव हा फक्त १९ फेब्रुवारीला वर्षातून एकदाच साजरा झाला पाहिजे, प्रति शिवजन्मोत्सव साजरा होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, कोणत्याही प्रकारे देणगी जमा करू नये, पावती पुस्तके छापू नयेत, खिशातून पैसे खर्च करून उत्सव साजरा करावा, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे वापरू नये, वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी मंडप टाकावा, अशा सूचना उपस्थित मान्यवरांनी केल्या.