शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठाकडून पुरवणी दीक्षांत ; ११ हजार ५०० विद्यार्थ्याना पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 17:26 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.३०) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. २०१८ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व दि. २९ जून २०२०पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत प्रक्रियेतून पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांची पुरवणी दिक्षांत प्रक्रिया कुलपतींच्या मान्यतेनंतर 11 हजार 500 विद्यार्थ्यांना पदवी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.३०) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा पुरवणी दीक्षांत प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित पूर्ण करण्यात येते. विद्यापीठाच्या पुरवणी दीक्षांता कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून २०१८ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व दि. २९ जून २०२०पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत  प्रक्रियेतून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिनियमातील निर्देशांनुसार  दरवर्षी दोन वेळेस पदवी प्रदान करण्यात येते. मुख्य दिक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते जाहिरपणे पदवी प्रदान करण्यात येते तर पुरवणी दीक्षांत प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना पदवी प्रदान करण्यात येते. त्यामुसार २०१९ च्या हिवाळी सत्रात उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच २९ जून २०२० पूर्वी पीएच.डी. जाहिर झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच २०१८ हिवाळी सत्रातील इंटरर्नशिप पूर्ण झालेले सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी व फेलोशिप आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या सुमारे ११ हजार ५०० पेक्षा अधिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, पुरवणी दीक्षांत विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे संलग्नित महाविद्यालयाकडे पाठविण्यात येते. विद्यार्थ्यांनी ती संबंधित महाविद्यालयातून प्राप्त करावीत असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे  पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या  संकेतस्थळावरुन नमूना अर्ज डाऊनलोड करुन २६ जून २०२०पूर्वी विद्यापीठाकडे ई-मेलव्दारा सादर करावा. मुदतीत अर्ज सादर करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहीती परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHealthआरोग्यuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीMedicalवैद्यकीय