आरोग्य विद्यापीठाचा ३१ रोजी पदवीदान समारंभ

By Admin | Updated: May 29, 2014 00:50 IST2014-05-29T00:45:35+5:302014-05-29T00:50:37+5:30

नाशिक (प्रतिनिधी)- आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा तेरावा पदवीदान सोहळा येत्या ३१ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत सोहळ्याचे अध्यक्षपद राज्याचे उपमुख्यमंत्री तथा प्रभारी प्र-कुलपती अजित पवार हे भूषविणार आहेत.

Degree ceremonies of 31th anniversary of Health University | आरोग्य विद्यापीठाचा ३१ रोजी पदवीदान समारंभ

आरोग्य विद्यापीठाचा ३१ रोजी पदवीदान समारंभ

नाशिक (प्रतिनिधी)- आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा तेरावा पदवीदान सोहळा येत्या ३१ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत सोहळ्याचे अध्यक्षपद राज्याचे उपमुख्यमंत्री तथा प्रभारी प्र-कुलपती अजित पवार हे भूषविणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. विश्व मोहन कटोच हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.पी. लोकवाणी, शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि माहिती जनसंपर्क विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या दीक्षांत समारंभात विविध आरोग्य विद्याशाखांतील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रथम आणि विविध विषयांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Degree ceremonies of 31th anniversary of Health University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.