शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:50 IST

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोपरगाव तालुक्यातील तिघा संशयितांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे परत न करता या त्रिकुटाने नाशिकमधील द्वारका परिसरात बोगस कंपनीची स्थापना करून नाशिककरांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे़

नाशिक : अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोपरगाव तालुक्यातील तिघा संशयितांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे परत न करता या त्रिकुटाने नाशिकमधील द्वारका परिसरात बोगस कंपनीची स्थापना करून नाशिककरांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे़  या फसवणूक प्रकरणी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथील गुंतवणूकदारांनी सोमवारी (दि़२) भद्रकाली पोलिसांची भेट घेऊन लेखी तक्रार केली असून, चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे़  पुणे जिल्ह्णातील विठ्ठल धुमाळ यांनी भद्रकाली पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार संशयित प्रवीण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुखदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी (रा. संवत्सर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) जानेवारी २०१६ मध्ये संशयित वरगुडे हे चिंचोली मोराची येथे आले व व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास वर्षभरात दामदुप्पट परतावा मिळणार असल्याचे सांगितले़ यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदार विठ्ठल धुमाळ यांच्यासह निवृत्ती व्यंकटराव धुमाळ, सावळा विठ्ठल धुमाळ, दीपाली सावळा धुमाळ, विकास निवृत्ती धुमाळ, स्वप्निल विठ्ठल धुमाळ, दादाभाऊ रघुनाथ पोखरकर, दत्तात्रय जयवंत उबाळे, निर्मला भाऊसाहेब धुमाळ, रामदास पोपट धुमाळ, दत्तात्रय दादाभाऊ बरबटे, किरण बाजीराव धुमाळ, मच्छिंद्र साकोरे, बाळासाहेब रामभाऊ नाणेकर, महादेव सुभाष फंड, प्रमोद महादेव मोरे यांनी सुमारे २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली.  गुंतवणूकदारांना रकमेच्या मोबदल्यात व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस, साई प्रणव सर्व्हिसेस या नावाने क्रेडिट व्हाऊचर्स दिले व वर्ष संपण्यापूर्वी धनादेश देण्यात आले, मात्र धनादेश बॅँकेत टाकण्यापूर्वी पुन्हा परत घेत पुढील वर्षाचे धनादेश देण्यात  आले़  विशेष म्हणजे आता तर गुंतवणूकदारांना एप्रिल २०१८ चे धनादेश देत फसवणूक केली आहे. दरम्यान, या संशयितांनी कोपरगावमध्येही अनेकांची फसवणूक केली असून गत काही दिवसांपासून द्वारका परिसरातील बोडके प्लाझामध्ये ‘सक्सेस ट्री फार्म’ नावाने बोगस कंपनी सुरू केली आहे़ गुंतवणूकदारांना संचालकांची माहिती मिळताच त्यांनी आपल्या रकमेची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय