बालाजी मंदिरात ‘दीपोत्सव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:20 IST2018-11-24T00:01:58+5:302018-11-24T00:20:06+5:30
व्यंकटेश बालाजी मंदिर लाखो दिव्यांनी उजळून निघाले होते. निमित्त होते त्रिपुरारी पौर्णिमेचे. मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन लाखांपेक्षा जास्त पणत्या प्रज्वलित केल्यामुळे वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते.

बालाजी मंदिरात ‘दीपोत्सव’
गंगापूर : गावातील व्यंकटेश बालाजी मंदिर लाखो दिव्यांनी उजळून निघाले होते. निमित्त होते त्रिपुरारी पौर्णिमेचे. मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन लाखांपेक्षा जास्त पणत्या प्रज्वलित केल्यामुळे वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गंगापूर गावातील व्यंकटेश बालाजी मंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे रतन लाथ व शर्वरी लाथा यांच्या हस्ते प्रथम दिव्याचे प्रज्वलन केले. बालाजी मंदिराची स्थापना २००६ मध्ये झाली २००७ पासून दरवर्षी हा दीपोत्सवाची कार्यक्रम घेतला जात आहे. या कार्यक्रमासाठी भाविक घरूनच दिवे घेऊन सहभागी होतात. कार्तिक पौणिमेनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होऊन परिसरात काढलेल्या सुबक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. मंदिराच्या प्रांगणात पणत्या प्रज्वलित झाल्याने मंदिराला सोनेरी झळाळी प्राप्त झाल्याचे चित्र रात्री पहायला मिळाले.
आगळावेगळा दीपोत्सव डोळ्यात साठविण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी झाली होती. अनेक भाविक पणत्या प्रज्वलित करताना कुटुंबांच्या सदस्यांसोबत सेल्फी काढत होती शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद भार्गवे, विश्वस्त राजाभाऊ मोगल,
अशोक खोडके, नरेंद्र चांदवडकर, अवधूत देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे, व्यवस्थापक राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.