शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

दीपकचा जामीन नामंजूर : एचएएलच्या विमानांची माहिती 'आयएसआय'ला पुरविल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 19:31 IST

देशाच्या सुरक्षाव्यवस्थेकरिता व संरक्षण खात्याच्या एचएएलसारख्या कारखान्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी असल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर न्यायालयात म्हणाले.

ठळक मुद्देपाकस्थित लोकांना संवेदनशील माहिती पुरवल्याबाबत न्यायालयात पुरावे एचएएल कर्मचारी दीपक हा पाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला

नाशिक : भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानच्या 'आयएसआय' या गुप्तचर संस्थेला पुरविल्याच्या आरोपाखाली राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात अटक केलेल्या एचएएल कर्मचारी दीपक शिरसाठ याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.५) नामंजूर केला.व्हॉट्सअपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली आणि या ओळखीतून पुढे तिच्या मोहक अन‌् भावुक बोलण्याकडे आकर्षित होत गेलेला दीपक हा कधी पाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला हे त्यालाही कळले नाही. त्यानंतर त्या अनोळखी महिलेच्या सांगण्यावरुन याने थेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथील प्रतिबंधीत क्षेत्राची व तेथे तयार केले जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या लढाऊ सुखोई विमानांची तसेच त्यांच्या अन्य संवेदनशील भागाची व इतर सुरक्षा संबंधीत गोपनीय माहिती सोशल मीडियावरुन महिलेला पुरविल्याची धक्कादायक बाब एटीएसच्या पथकाने दोन महिन्यांपुर्वी उघडकीस आणली होती. दीपकला बेड्या ठोकल्यानंतर त्यास न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यात दीपकने पाकस्थित काही व्यक्ती ज्या अन्य देशांमध्ये आहे, त्यांना माहिती पुरविल्याचे तपासात समोर आले आहे, यामुळे दीपकची रवानगी कारागृहात करण्यात आली.

दरम्यान, दीपकने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यात सरकारी पक्षातर्फे दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयात दीपकने पाकस्थित लोकांना संवेदनशील माहिती पुरवल्याबाबत न्यायालयात पुरावे सादर केले. त्यात दीपकने पाकिस्तानला पुरवलेली माहिती मिळवणे अतिशय अवघड असतानाही ती माहिती मिळवून पाकिस्तानला पाठवली. त्यामुळे देशाच्या सुरक्षाव्यवस्थेकरिता व संरक्षण खात्याच्या एचएएलसारख्या कारखान्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी असल्याचे मिसर न्यायालयात म्हणाले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दीपक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

टॅग्स :airforceहवाईदलNashikनाशिकPakistanपाकिस्तानCourtन्यायालयISIआयएसआय