साताळीत गावतळ्याचे खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:36 IST2018-03-29T00:36:42+5:302018-03-29T00:36:42+5:30
साताळी येथे लोकसहभाग व चौदाव्या वित्त आयोगाच्या एक लाख रुपयांच्या निधीतून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दीड एकर जागेतील सार्वजनिक गावतळ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याने गावतळ्याच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

साताळीत गावतळ्याचे खोलीकरण
जळगाव नेऊर : साताळी येथे लोकसहभाग व चौदाव्या वित्त आयोगाच्या एक लाख रुपयांच्या निधीतून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दीड एकर जागेतील सार्वजनिक गावतळ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याने गावतळ्याच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उपसलेला गाळ साताळी येथील शेतकºयांनी लोकसहभागातून वाहून नेत आपल्या शेतात टाकला आहे. त्यामुळे शेतीही सुपीक होण्यासह गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे. परिसरातील पावसाचे वाहून जाणारे पाणी तळ्यात साठवण्यासाठी तीन इनलेटचे काम करण्यात आले आहे. गावतळ्याचे काम पूर्ण झाले असून, यासाठी शेतकरी व ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले आहे. दरम्यान, मग्रारोहयोतून ५० फूट खोल नवीन विहिरीचे खोदकाम व बांधकाम मंजूर असून, या विहिरीचे पाणी निर्जंतुक करून पाइपलाइनद्वारे साताळी गावातील घरोघरी पुरवण्यात येणार आहे. या तळ्यातून १६ ट्रॅक्टरद्वारे ८०० ट्रॉली गाळ काढल्याने गावतळ्याची साठवण क्षमता कमालीची वाढली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.