गिरणारे रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:54+5:302021-05-08T04:14:54+5:30
नाशिक बिल्डर असोसिएशन व खासदार गोडसे यांच्या पुढाकाराने स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट हे ...

गिरणारे रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण
नाशिक बिल्डर असोसिएशन व खासदार गोडसे यांच्या पुढाकाराने स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट हे बडोदा येथील ॲरो या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निमिर्तीची क्षमता प्रतितास ८३ लिटर असून, या युनिटमुळे सुमारे २५ रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. यावेळी माजी मंत्री बबन घोलप, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, तहसीलदार अनिल दोंडे, गटविकास अधिकारी संगीता बारी, अभय चौकसी, विजय बाविस्कर, भाऊसाहेब सांगळे, बी. टी. कडलग, अनिल ढिकले, वामन खोस्कर, दिलीप थेटे, नितीन गायकर, सदानंद नवले, अनिल थेटे, दत्तू ढगे, विवेक थेटे, महेंद्र थेटे, अविनाश पाटील, मनोज बाविस्कर, सरपंच अलकाताई दिवे, उपसरपंच तानाजी गायकर आदींसह नाशिक बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.