घोटीत ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 00:11 IST2021-09-24T00:08:40+5:302021-09-24T00:11:56+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात ३०० लीटर प्रति मिनिट निर्मितीचा नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामण खोसकर होते.

घोटी येथील ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी छगन भुजबळांसमवेत हिरामण खोसकर, शिवराम झोले, संदीप गुळवे, उदय जाधव, गोरख बोडके, अशोक थोरात, डॉ. कपिल आहेर, डॉ. एम. बी. देशमुख, डॉ. संजय सदावर्ते आदी
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात ३०० लीटर प्रति मिनिट निर्मितीचा नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामण खोसकर होते.
घोटी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आयोजित समारंभाप्रसंगी इगतपुरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याला ऑक्सिजन कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. विविध अत्याधुनिक प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीसाठी नाशिक जिल्हा सतर्क असून, आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्याला ऑक्सिजनसह मुबलक सेवा पुरविल्या जाणार आहेत. कोरोनाचे संकट अजून टळले नसून, सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. महामार्गावरील रस्त्यांबाबत दुरवस्था झाली असली तरी काही दिवसांत रस्ते खड्डेमुक्त होतील. तसेच घोटी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या मागणीला पोकळ आश्वासन देणार नाही. निधीच्या माध्यमातून लवकरच विचार करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या ऑक्सिजन प्लांटमुळे इगतपुरी ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होऊन येथील ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले.
ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासक संदीप गुळवे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक गोरख बोडके, रामदास भोर, संजय आरोटे, सचिन गोणके, पांडुरंग वारूगसे, शिवा काळे, निलेश कडू, पांडुरंग शिंदे, संपत काळे, तुकाराम वारघडे, खंडू परदेशी, सचिन तारगे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते, डॉ. राहुल वाघ, डॉ. अविनाश गोरे, डॉ. किरण कानवडे, डॉ. सचिन म्हाकने, डॉ. प्रीती वाडेकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा घंदास, पोलीस हवालदार कांगने आदी उपस्थित होते.