पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे डास प्रतिबंधात्मक यंत्रांचे लोकार्पण.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:12 IST2020-10-22T21:56:19+5:302020-10-23T00:12:16+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोना बरोबरच डेंगू सारख्या साथीच्या रोगाचा पादुर्भाव वाढू नये व डासांचा नायनाट व्हावा या उदात्त हेतूने पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या वतीने डास प्रतिबंधात्मक (फोगिंग ) यंत्रांचे अनावरण सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपळगाव बसवंत: डास प्रतिबंधात्मक यंत्रांचे लोकार्पण करताना सरपंच अलका बनकर, समवेत उपसरपंच अश्विनी खोडे, सदस्य गणेश बनकर आदी.
पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोना बरोबरच डेंगू सारख्या साथीच्या रोगाचा पादुर्भाव वाढू नये व डासांचा नायनाट व्हावा या उदात्त हेतूने पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या वतीने डास प्रतिबंधात्मक (फोगिंग ) यंत्रांचे अनावरण सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच अलका बनकर, उपसरपंच अश्विनी खोडे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, विश्वास मोरे, रवींद्र मोरे, अल्पेश पारख, रामकृष्ण खोडे, किरण लभडे, बापू कडाळे, नंदू गांगुर्डे, रुक्मिणी मोरे, सत्यभामा बनकर, सुरेश गायकवाड, अंकुश वारडे, अजय चोरडिया, ग्रामसेवक लिंगराज जंगम आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळ्यात पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या रोगांचा अधिक धोका निर्माण होतो तो लक्षात घेता पिंपळगाव शहरात डास प्रतिबंध फोगिंग यंत्राचे अनावरण करण्यात आले निश्चित या पुढे शहरात डेंगू सारख्या आजाराला दूर ठेवण्यास त्याची मद्दत होईल...
अलका बनकर
सरपंच पिंपळगाव बसवंत.