शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

डुबेरे विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:52 PM

सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा सिन्नर नगरपालिका शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला

सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जलकुंभाचे लोकार्पण मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा सिन्नर नगरपालिका शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे , खजिनदार बबनराव वाजे ,मनीष गुजराथी , आर्किटेक्चर जितेंद्र जगताप ,कॉन्ट्रॅक्टर सोपान परदेशी ,डॉक्टर विजय लोहरकर ,संजय सानप , रामनाथ पावसे , तेजस्विनी वाजे ,डॉक्टर सुजाता लोहारकर ,संगीता कटयारे,शिल्पा गुजराथी , प्राचार्य सोपान येवले आदी उपस्थित होते .जलकुंभामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे . विद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे .विद्यार्थ्यांना चांगले शुद्ध स्वरूपात पाणी मिळणार आहे . विद्यार्थ्यांची तहान भागणार आहे. जलकुंभ बांधून दिल्यामुळे वारुंगसे यांनी अतिशय चांगले समाजोपयोगी काम केले आहे. त्यांचे काम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार हेमंतनाना यांनी काढले.लायन्स क्लब ऑफ़ सिन्नर सिटी तसेच स्व. रामभाऊ गोपाळा वारुंगसे व स्व. द्रोपदाबाई रामभाऊ वारुंगसे यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष पांडुरंग रामभाऊ वारुंगसे यांच्याकडून विद्यालयाला 10 हजार लिटर क्षमतेचा पिण्याच्या पाण्याचा जलकुंभ बांधून दिला आहे. उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव वामने यांनी स्वतः च्या खर्चातून पाईप लाईन करून स्वतःच्या विहिरीचे पाणी विद्यार्थ्यांसाठी जलकुंभात उपलब्ध करून दिले. पांडुरंग वारुंगसे यांनी भविष्यात विविध शैक्षणिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. यावेळी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे खजिनदार बबनराव वाजे यांनी विद्यालयासाठी सॅनिटायझर स्टॅन्ड तसेच पांडुरंग वारुंगसे यांनी हँडवॉश उपलब्ध करून देण्याची जाहीर केले . पाईपलाईन खोदण्यासाठी रामनाथ पावसे यांनी जेसीबी मोफत उपलब्ध करन दिले.उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .विद्यालयाचे प्राचार्य सोपान येवले यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन पांडुरंग करपे यांनी तर आभार एकनाथ खैरनार यांनी मानले.यावेळी भाऊसाहेब सहाणे, सोमनाथ गिरी, मंजूश्री आहेर ,सोमनाथ पगार, राजेंद्र गांगुर्डे ,मारुती डगळे ,विजय कोकाटे, एस. बी.गुरुळे ,लिपिक आर. डी .घुमरे ,राणी शिंदे , एस. एस. बोराडे ,सुनिल पवार, किशोर शिंदे, सचिन गिते ,अनिल काळे ,रवी गोजरे, मधुकर रोडे उपस्थित होते. 

टॅग्स :Studentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा