लासलगाव येथे घंटागाड्यांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 00:46 IST2021-06-08T00:44:15+5:302021-06-08T00:46:59+5:30
लासलगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात कोव्हिड नियमांचे पालन करून शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या दोन घंटागाड्यांचे लोकार्पण सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात दोन घंटागाड्यांच्या लोकार्पण प्रसंगी जयदत्त होळकर व उपस्थित सदस्य.
लासलगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात कोव्हिड नियमांचे पालन करून शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या दोन घंटागाड्यांचे लोकार्पण सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या संसर्गामुळे यावर्षी शासनाने निर्देशित केलेल्या कोव्हिड नियमांचे पालन करून हा सोहळा साजरा करण्यात आला असल्याची माहिती सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली. यावेळी उपसरपंच अफजल शेख, ग्रामसेवक शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर, संतोष पलोड, रामनाथ शेजवळ, सदस्य संगीता पाटील, सुवर्णा जगताप, ज्योती निकम, अश्विनी बर्डे, अमोल थोरे, रोहित पाटील, प्रा. किशोर गोसावी, संदीप उगले, गोकुळ पाटील, विजय जोशी, संजय बिरार, ब्राम्हणगावचे माजी सरपंच नाना बनसोडे, गणेश निकम व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.