जिल्हा बॅँकेच्या शाखेसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:30 IST2019-01-09T00:28:46+5:302019-01-09T00:30:08+5:30
पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाय अधिक खोलात जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांमधील तिजोरीत खडखडाट झाला असून स्वत:ची रक्कम मिळत नसल्याने शाखांमध्ये शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. वारंवार हेलपाटे मारूनही पैसे मिळत नसल्याने पिंपळगाव बसवंत या दोन शाखांमध्ये शेतकºयांनी मंगळवारी (दि.८) घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

जिल्हा बॅँकेच्या शाखेसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाय अधिक खोलात जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांमधील तिजोरीत खडखडाट झाला असून स्वत:ची रक्कम मिळत नसल्याने शाखांमध्ये शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. वारंवार हेलपाटे मारूनही पैसे मिळत नसल्याने पिंपळगाव बसवंत या दोन शाखांमध्ये शेतकºयांनी मंगळवारी (दि.८) घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.
नाशिक जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून रोकड उपलब्ध होत नाही. त्यामुळे खात्यावर रक्कम असूनही ती मिळत नसल्याने शेतकरी व निवृत्ती वेतन धारकांना हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकºयांना सध्या द्राक्षबागेत डिपींग, रासायनिक खते आदीसाठी भांडवल आवश्यक आहे. कृषीनिविष्ठा विक्र ेते उधार द्यायला किंवा जिल्हा बँकेचे धनादेश स्वीकारत नसल्याने शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. जिल्हा बँकेने निफाड तालुक्यात दोनशे कोटी रु पयांचे पीक व मध्यम मुदतीचे कर्ज वाटप केले. त्यातील ७० टक्के रक्कम थकविल्याने जिल्हा बँकेची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. थकबाकीदाराकडे वसुलीला बंधन,त्यात कर्जमाफीचा घोळ यामुळे जिल्हा बँकेच्या कर्मचाºयांनाही मर्यादा आल्या आहेत.
दरम्यान, निफाड तालुक्यातील विविध शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. मंगळवारी (दि.८) पिंपळगाव बसवंत मार्केटयार्ड शाखेत रक्कम मिळविण्यासाठी तासन्तास उभ्या राहिलेल्या खातेदारांचा संयम संपला आणि त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. यावेळी सुरेश मेगाने, शंकर पवार, बबन विधाते,रतन तिडके,खंडेराव मोरे,माधव मोरे, राजाराम विधाते,सोपान बनकर, मथुराबाई निर्भवणे आदीसह खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठ दिवसांपासून स्वत:च्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. द्राक्षे बागेला खते व औषधी खरेदीसाठी पैशांची गरज आहे पण बँकेचे कर्मचारी पैसे नसल्याचे सांगतात.
सुरेश मेगाने, खातेदार शेतकरी
वसुली होत नसल्याने ही आर्थिक कोंडी निर्माण झालेली आहे. वरिष्ठ कार्यालयाला याबाबत माहिती दिली असून लवकर लवकरच यावर मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
- बी.डी गांगुर्डे, विभागीय अधिकारी, जिल्हा बँक, निफाड