पेट्रोलपंपचालकांच्या संपाबाबत सोमवारी निर्णय
By Admin | Updated: June 11, 2017 21:21 IST2017-06-11T21:21:37+5:302017-06-11T21:21:37+5:30
राज्याच्या पेट्रोल असोसिएशनकडून नाशिक विभागीय पेट्रोल डिलर्स असोसिएशनला कुठल्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

पेट्रोलपंपचालकांच्या संपाबाबत सोमवारी निर्णय
नाशिक : दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये बदल करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आॅल इंडिया पेट्रोल असोसिएशनकडून जरी येत्या शुक्रवार (दि.१६) पासून संप पुकारण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी राज्याच्या पेट्रोल असोसिएशनकडून नाशिक विभागीय पेट्रोल डिलर्स असोसिएशनला कुठल्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. यामुळे सोमवारी सकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा करणार आहेत. तसेच राज्याच्या पेट्रोल असोसिएशनकडूनदेखील याबाबत सूचना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर येत्या शुक्रवारच्या पेट्रोलपंपचालकांच्या संपाबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती नाशिक पेट्रोल असोसिएशनचे भरत टाकेकर यांनी दिली. बैठकीत राज्याच्या समितीकडून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि राज्यस्तरावर घेतला जाणारा निर्णय याविषयी चर्चा होऊन संपाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.