शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहातील कालबाह्य रूढींना फाटा देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:00 IST

विवाह समारंभ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी मानला जातो, त्यामुळे बहुतांश समाजामध्ये विवाह समारंभावर मोठा खर्च करण्यात येतो. समाजातील काही परिवारांमध्ये चुरस म्हणून इतरांपेक्षा जास्त डामडौल दाखविण्यासाठी लग्नकार्यात अमर्याद आणि अनावश्यक खर्च केला जातो.

नाशिक : विवाह समारंभ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी मानला जातो, त्यामुळे बहुतांश समाजामध्ये विवाह समारंभावर मोठा खर्च करण्यात येतो. समाजातील काही परिवारांमध्ये चुरस म्हणून इतरांपेक्षा जास्त डामडौल दाखविण्यासाठी लग्नकार्यात अमर्याद आणि अनावश्यक खर्च केला जातो.  रूढी-परंपरांचा पगडादेखील या खर्चाला कारणीभूत ठरून त्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु रूढी-परंपरांना फाटा देत लग्नकार्य साधेपणाने करण्याची नवीन प्रथा रूढ होत आहे. अशाप्रकारचे ठरावच समाजातील अधिवेशन किंवा बैठकांमध्ये घेण्यात येत आहेत. विशेषत: आहेर, हुंडा, मानपान या प्रथा टाळण्याचा निर्णय घेतला जात आहे .  विवाह समारंभात काही कुटुंब रूढी-परंपरांच्या नावाखाली अनावश्यक खर्च करतात. त्याचा आर्थिक भुर्दंड लग्न करणाऱ्या परिवाराला बसतो. विशेषत: वधूपित्याला हुंडा, मानपान आहेर यासाठी कर्ज काढून खर्च करावा लागतो. हे टाळण्यासाठी अनेक सामाजिक समाजामध्ये प्रबोधन घडत आहे.  लाड शाखीय वाणी समाजाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात विवाहाचा खर्च वधू-वर या दोन्ही पक्षांनी करावा, हुंडा घेऊ नये आणि देऊ नये, आहेर देण्याची पद्धत बंद करावी, असा निर्णय बैठकांमध्ये घेण्यात आला आहे.डीजेवर बंदीनाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील माळी व मराठा समाजातील काही कुटुंबांनी लग्नातील मानपानावरील खर्चाला फाटा देत मुलींची शाळा, वसतिगृह व आदिवासी सामाजिक संघटनांना मदत केली आहे. तसेच लग्नपत्रिका छापून गावोगाव वाटप करण्याची प्रथा बंद केली जात असून, त्याऐवजी मोबाइलद्वारे संदेश पाठविण्यात येत आहेत. तसेच काही गावांत विवाह समारंभातील डिजे वाजविण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्नsocial workerसमाजसेवक