व्यापाºयांच्या प्रश्नी संघटित प्रयत्न करण्यावर भरव्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:48 IST2017-11-19T23:43:38+5:302017-11-19T23:48:56+5:30
नाशिक : शहरातील विविध भागातील व्यापारी व उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापुढे व्यापारी, उद्योजकांचे कोणतेही प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत घेण्यात आला.

व्यापाºयांच्या प्रश्नी संघटित प्रयत्न करण्यावर भरव्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत निर्णय
नाशिक : शहरातील विविध भागातील व्यापारी व उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापुढे व्यापारी, उद्योजकांचे कोणतेही प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत घेण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले की, संघटितपणे प्रयत्न केल्यास व्यापारी व उद्योजकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. शासनाकडे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जाताना त्या संघटनेकडे सभासद संख्याबळ किती आहे, हे बघितले जाते. त्यातूनच निश्चितपणे विविध प्रश्नांची सोडवणूक होते. यासाठी संघटना मजबूत करण्याची गरज आहे. नाशिक धान्य किराणा, किरकोळ व्यापारी संघटनेचे कार्य नाशिक जिल्ह्यात अन्य संघटनांना दिशादर्शक आहे.
याप्रसंगी दत्तात्रय चांदवडकर, मधुकर चांदवडकर, वेदप्रकाश अग्रवाल, दत्तात्रय धामणे आदींचा सत्कार करण्यात आला. शेखर दशपुते यांनी प्रास्ताविक केले. विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ अमृतकर यांनी आभार मानले. महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत राठी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, किरकोळ व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या पद्धती या काळानुरूप बदलावयास हव्यात. आॅनलाइन शॉपिंग, मॉल, मोठे व्यवसाय, आधुनिक सुविधांचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करत असतात. आपणही आपल्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपला व्यवसाय वाढवला पाहिजे. यासाठी संघटनेने आपल्या सभासदांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करून तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण घ्यावे.