३१ डिसेंबरला अवघ्या ३३ तळीरामांवर कारवाई

By Admin | Updated: January 2, 2017 01:26 IST2017-01-02T01:16:08+5:302017-01-02T01:26:35+5:30

थर्टीफर्स्ट : नोटाबंदीचा फटका आणि कडेकोट पोलीस बंदोबस्ताचा परिणाम; एक लाखाचा दंड वसूल

On December 31, only 33 policemen were arrested | ३१ डिसेंबरला अवघ्या ३३ तळीरामांवर कारवाई

३१ डिसेंबरला अवघ्या ३३ तळीरामांवर कारवाई

नाशिक : ‘नवीन वर्षाचे स्वागत अन् मद्यपे्रमींना उधाण’ हे आजपर्यंतचे समीकरण़ मात्र यावर्षी नोटाबंदीचा फटका की पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त यामुळे शहरात प्रमाणापेक्षा अधिकच शांतता आढळून आली़ विशेष म्हणजे यावर्षी संपूर्ण पोलीस आयुक्तालय हद्दीत मद्यसेवन करून वाहन चालविताना केवळ ३३ नागरिक पोलिसांना आढळून आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे़
नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही अशा पद्धतीने नागरिकांनी वर्तणूक ठेवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. तसेच ३१ डिसेंबरला रात्रभर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहरातील विविध हॉटेल्सचालकांनी विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले होते़ मात्र या कार्यक्रमांऐवजी मद्यप्रेमींनी वॉइन शॉपला पसंती देत नवीन वर्ष आपल्या घरीच साजरा करण्याचे नियोजन केल्याचे दिसून आले़
ग्रामीण पोलिसांनी मद्यसेवन करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी १२, तर शहर पोलिसांनी ९ ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन सज्ज ठेवले होते़ त्यामध्ये शहर पोलिसांनी ८६ हजार रुपयांचे एक असे तीन नवीन मशीनची खरेदी केली, मात्र कारवाई पाहता या मशीनची रक्कमही वसूल झाली नसल्याची चर्चा आहे़ पोलिसांनी रात्रभर सुमारे पाचशेहून अधिक वाहनांची तपासणी केली असता त्यात शहर पोलिसांनी दहा तर वाहतूक शाखेत अवघे २३ मद्यपी आढळून आले़ त्यामुळे मद्यपींनी पोलिसांचा धसका घेतला की काय असा प्रश्न आहे़
दरम्यान, शहर वाहतूक शाखेने शनिवारी (दि.३१) दिवसभर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४१४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On December 31, only 33 policemen were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.