शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

मराठा तरुणांना उद्योगांसाठी सहकारी बँकेतूनही कर्जसुविधा : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:14 IST

नाशिक : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दहा लाखांपर्यंतचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ७५ टक्के कर्जाची थकहमी घेण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच सहकारी बँकेतूनही कर्जसुविधा उपलब्ध व्हावी यासाठी धोरण निश्चित केले जाणार असल्याचे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मेरी परिसरात सुरू करण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षांसाठी पुण्याला मार्गदर्शन केंद्रमराठा समाजाला आरक्षणापूर्वीच सुविधा

नाशिक : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दहा लाखांपर्यंतचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ७५ टक्के कर्जाची थकहमी घेण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच सहकारी बँकेतूनही कर्जसुविधा उपलब्ध व्हावी यासाठी धोरण निश्चित केले जाणार असल्याचे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मेरी परिसरात सुरू करण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पाटील यांनी सांगितले की, पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दरवर्षी दहा हजार युवकांना दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे़ या कर्जाची मूळ रक्कम ही पाच वर्षांत परत करावयाची असून, आतापर्यंत ६०० तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जाची मागणी करताना प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. हा प्रकल्प अहवाल तरुणांना मोफत तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी़ या प्रकल्प अहवालानंतरही बॅँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यास बँकेच्या मॅनेजरला घेराव घाला, असा सल्लाही पाटील यांनी दिला़

मराठा समाजातील युवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कापैकी पन्नास टक्के रक्कम ही शासन अदा करते़ गतवर्षी २ लाख ५४ हजार विद्यार्थ्यांचे ६५४ कोटी रुपयांचे शैक्षणिक शुल्क शासनाने विद्यार्थ्यांना परत केले आहे. तर यावर्षीपासून प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून ५० टक्के च रक्कम घेण्याच्या सूचना शैक्षणिक संस्थांना देण्यात आल्या असून उर्वरित रक्कम शासन संस्थांना अदा करणार आहे़

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृह उभारले जात आहे़ यासाठी जागेचा प्रश्न पुढे आल्यानंतर शासनाच्या पडून असलेल्या इमारतींचा उपयोग करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत़ वसतिगृह चालविणाऱ्या संस्थेस मोठ्या शहरांमध्ये प्रतिविद्यार्थी दहा हजार तर लहान शहरांमध्ये आठ हजार रुपये शासनातर्फे दिले जाणार आहे़ राज्यात आतापर्यंत सहा वसतिगृह सुरू करण्यात आले असून, नाशिकमधील वसतिगृह सर्व सोयीसुविधांयुक्त असल्याचे पाटील यांनी सांगितले़स्पर्धा परीक्षांसाठी पुण्याला मार्गदर्शन केंद्रमराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास व मार्गदर्शनासाठी पुणे येथे केंद्र सुरू केले जाणार आहे़ यासाठी सारथी संस्थेला ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़ स्पर्धा परीक्षांबरोबरच परदेशात शिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे़आरक्षणापूर्वीच सुविधामराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले जाणार असून, त्याचा शिक्षण व नोकरीसाठी उपयोग होणार आहे़ मात्र, गत चार वर्षांत केवळ २० हजार शासकीय नोकºया निर्माण झाल्याने आरक्षणानुसार मराठा समाजाला केवळ ३ हजार २०० जागा मिळतील व या तुटपुंज्या जागांमुळे समाजातील तरुणांचा प्रश्न सुटणार नाही़ त्यामुळे सरकारने आरक्षणापूर्वीच शिक्षणात पन्नास टक्के शुल्कात सवलत तसेच उद्योग व्यवसायासाठी कर्जसुविधा उपलब्ध करून दिली आहे़

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी