विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:09 IST2018-07-15T01:09:46+5:302018-07-15T01:09:52+5:30

खर्डे : येथील महाविद्यालयीन विद्यार्थी भावेश रामदास गांगुर्डे (१८) याचा विजेचा शॉक लागून आकस्मिक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

The death of the young person with electric shocks | विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

खर्डे : येथील महाविद्यालयीन विद्यार्थी भावेश रामदास गांगुर्डे (१८) याचा विजेचा शॉक लागून आकस्मिक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भावेश गांगुर्डे हा शनिवारी (दि. १४) दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील वीजपंप सुरू करण्यासाठी बसविण्यात आलेल्या पेटीजवळ गेल्यावर त्याला विजेचा धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. भावेश हा देवळा महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी रामदास गांगुर्डे यांचा मुलगा, तर नामदेव सावळीराम गांगुर्डे यांचा तो नातू होत.

Web Title: The death of the young person with electric shocks