विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 16:36 IST2019-11-29T16:36:01+5:302019-11-29T16:36:09+5:30
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच शिवारात विहिरीत पाय घसरुन १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच शिवारात विहिरीत पाय घसरुन १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सूरज प्रकाश कांगणे (१७) असे मृत युवकाचे नाव आहे. आई वडील शेतात काम करीत असतांना सूरज विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. साडेपाच वाजेच्या सुमारास तो विहिरीत पडला. रात्री दहा वाजेच्या सुमारास विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सूरज हा एकुलता एक होता. तो बारागावपिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.