सोनगाव येथील युवकाचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:07 IST2018-03-11T00:07:41+5:302018-03-11T00:07:41+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील सोनगाव येथील सामाजिक कार्यकर्ता सावळीराम शिवराम शेलार या युवकाचे दुचाकी अपघातात निधन झाले.

सोनगाव येथील युवकाचे अपघाती निधन
सायखेडा : निफाड तालुक्यातील सोनगाव येथील सामाजिक कार्यकर्ता सावळीराम शिवराम शेलार या युवकाचे दुचाकी अपघातात निधन झाले. सावळीराम शनिवारी दिवसभर दुसºयाच्या शेतात मोलमजुरी करून सायंकाळी ६ च्या सुमारास सिन्नर एमआयडीसीकडे कंपनीत जात असताना सावळी येथे रात्री ७ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अपघात होऊन त्यात तो ठार झाला. कसबे सुकेणे येथील काही तरुण तवेरा गाडीने (क्र. एमएच १५, बीएन ५१३३) नायगावकडून सावळीकडे येत असताना गाडीचा वेग कण्ट्रोल न झाल्याने मोटारसायकल (एमएच १५, एफई १९७३) यांच्यात समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात सोनगाव येथील सावळीराम शिवराम शेलार (४०) हा युवक ठार झाला. घरातील कर्ता माणूस गेल्याने शेलार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजई असा परिवार आहे. सायखेडा पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधीक तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.