कोराटे येथे विहिरीत बुडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:31 IST2018-09-13T00:30:45+5:302018-09-13T00:31:13+5:30
दिंडोरी : तालुक्यातील कोराटे येथे मनोज शिवाजी शिंदे (३७) या युवा शेतकºयाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

कोराटे येथे विहिरीत बुडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू
दिंडोरी : तालुक्यातील कोराटे येथे मनोज शिवाजी शिंदे (३७) या युवा शेतकºयाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
मनोज शिवाजी शिंदे हा सकाळी विहिरीत मोटारीचा पाइप बांधण्यासाठी पत्नीसोबत शेतात गेले होते. ते विहिरीत मोटरच्या फाउण्डेशनवर उभे राहून पाइप बांधत होते. पाइप बांधत असताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. हे दृश्य बघून त्यांच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतकºयांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गावकºयांनी मनोज शिंदे यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढला. दिंडोरी येथे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिंडोरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.