विजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू
By Admin | Updated: May 30, 2014 01:07 IST2014-05-29T22:29:37+5:302014-05-30T01:07:58+5:30
नाशिक : घरातील वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून युवतीचा मृत्यू झाल्याची घटना उपनगर येथे घडली़

विजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू
नाशिक : घरातील वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून युवतीचा मृत्यू झाल्याची घटना उपनगर येथे घडली़
शीला दिगंबर बरकड (१९), रा. फ्रायडिनटो कॉलनी, जुना सायखेडारोड, उपनगर असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे़ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात सदर युवती वाळत घातलेले कपडे काढत असताना, तेथील वीजप्रवाह वाहत असलेल्या वायरला तिचा हात लागला. यावेळी बसलेल्या विजेच्या धक्क्याने ती गंभीर जखमी झाली़ घरच्या मंडळींनी तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले; परंतु उपचारादरम्यान तिचे निधन झाले़ उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़