शेकोटीमुळे भाजलेल्या महिलेचा मृत्यू :

By Admin | Updated: November 23, 2014 00:34 IST2014-11-23T00:33:18+5:302014-11-23T00:34:08+5:30

पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

The death of a woman burnt due to fire: | शेकोटीमुळे भाजलेल्या महिलेचा मृत्यू :

शेकोटीमुळे भाजलेल्या महिलेचा मृत्यू :


नाशिक : शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले डेंग्यूचे रुग्ण व डास यापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध क्लृप्त्या अमलात आणत आहेत़ मात्र या क्लृप्त्या नागरिकांसाठी जीवघेण्या ठरत असल्याचे सिन्नर फाट्यावरील घटनेवरून समोर आले आहे़ डास मारण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीमुळे भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी अप्रत्यक्षपणे मच्छरांनीच या वृद्धेचा बळी घेतल्याची चर्चा परिसरात आहे़
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर फाट्यावरील त्रिशरण नगरमध्ये वेणुबाई नारायण खडताळे ही ८० वर्षांची वृद्धा राहते़ सिन्नर फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य पसरले असून, नागरिक सायंकाळी यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत़ यामध्ये कोणी दरवाजे व खिडक्यांना जाळ्या बसविल्या आहेत, तर कोणी डास प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत़ मच्छरांच्या पळवून लावण्यासाठी वेणुबाई रोज सायंकाळी शेकोटीचा धूर करीत असत़ शुक्रवारी रात्री त्यांनी अशीच शेकोटी करून धूर केला़
रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास या शेकोटीमुळे वेणुबार्इंच्या कपड्याने पेट घेतल्याने त्या भाजल्या़ त्यांना तत्काळ उपचारासाठी नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या आगीमध्ये त्या सुमारे ९९ टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ खडताळे यांचा मृत्यू जरी शेकोटीने पेट घेतल्याने झाला असला तरी मच्छरांसाठी काही ना काही उपाययोजना या कराव्याच लागतात व त्यांनी त्या केल्या़
दरम्यान, सिन्नरफाटा परिसरातील नगरसेवकांनी या भागात वाढलेल्या डासांकडे वेळीच लक्ष दिले असते परिसराची स्वच्छता केली असती तर वेणुबार्इंवर ही परिस्थिती उद्भवली नसली अशी चर्चा परिसरात सुरू आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The death of a woman burnt due to fire:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.