अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:09 IST2018-06-20T01:09:06+5:302018-06-20T01:09:06+5:30

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव परिसरातील ट्रक टर्मिनसजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही़

Death of an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव परिसरातील ट्रक टर्मिनसजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास ट्रक टर्मिनलजवळून हा इसम महामार्ग ओलांडत होता़
त्याचवेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यास जोरदार धडक दिली़
नागरिकांनी गंभीर जखमी या इसमास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ट्रक टर्मिनलजवळ रस्ते अपघाताच्या प्रकारात वाढ झाली आहे.

Web Title: Death of an unknown vehicle

टॅग्स :Accidentअपघात