वावी येथे बेशुध्द आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:45 IST2019-02-10T17:45:19+5:302019-02-10T17:45:31+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर वावी परिसरात हॉटेल साईराम समोर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.

वावी येथे बेशुध्द आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर वावी परिसरात हॉटेल साईराम समोर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीसांकडून सुरू आहे.
दि. २६ जानेवारी रोजी हॉटेल साईरामच्या समोर या व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पोलिसांमार्फत नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संबंधित अनोळखी व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून उपाशीपोटी होती. त्यामुळे प्रकृती खालावल्याने तो बेशुद्ध झालेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. अनोळखी इसमाचे अंदाजे वय ५५ वर्ष, उंची साडेपाच फूट, रंग निमगोरा, डोक्याचे केस वाढलेले व पूर्ण सफेद झालेले आणि अंगात राखाडी रंगाचे जॅकेट व नाईट पॅन्ट असा पोशाख असलेली ही व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास वावी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. जी. मोरे पुढील तपास करीत आहेत.