आठवड्यात दोन महिलांचा मृत्यू : नागरिकांनीच उभारले जेहान सर्कलवर ‘सिग्नल’
By Admin | Updated: March 26, 2017 22:32 IST2017-03-26T22:32:48+5:302017-03-26T22:32:48+5:30
गत आठवड्यात पाल्यांना परीक्षेहून घरी घेऊन जाणाऱ्या दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिली व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यामुळे जेहान सर्कलवर त्वरित सिग्नल यंत्रणा बसवावी

आठवड्यात दोन महिलांचा मृत्यू : नागरिकांनीच उभारले जेहान सर्कलवर ‘सिग्नल’
नाशिक : शहरात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली असून, गंगापूररोडवरील जेहान सर्कल हा हॉट स्पॉट बनला आहे़ गत आठवड्यात पाल्यांना परीक्षेहून घरी घेऊन जाणाऱ्या दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिली व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यामुळे जेहान सर्कलवर त्वरित सिग्नल यंत्रणा बसवावी तसेच महिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लेवा सखी मंचच्या महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नागरिकांनी रविवारी (दि़२६) सायंकाळी एकत्र येत प्रतिकात्मक सिग्नल तयार करून तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून अभिनव आंदोलन केले़
गंगापूररोडवरील जेहान सर्कल, शहीद चौक, सप्तरंग हॉटेल या ठिकाणी मोठ्या संख्येने अपघात होतात़ या अपघातांना आळा घालण्यासाठी याठिकाणी सिग्नल बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ गत आठवडाभरात नीलिमा चौधरी व प्रा़ रूपाली पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला़ यामुळे परिसरातील महिला व नागरिकांनी रविवारी सायंकाळी जेहान सर्कलवर एकत्र आले़ यातील महिलांच्या हातामध्ये वाहतूक नियमांचे पालन करा, वेगमर्यादा पाळा या जनजागृतीपर घोषणांसह मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहण्यात आली़