टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: December 14, 2014 01:42 IST2014-12-14T01:40:10+5:302014-12-14T01:42:28+5:30

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील इसमाचा मृत्यू

Death of a two-wheeler in the tempo shock | टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील इसमाचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील इसमाचा मृत्यू

  नाशिक : टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत धोंडमाळच्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पेठ चेक पोस्टजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली़ या प्रकरणी टेम्पोचालक आनंद भगतवर पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पेठ तालुक्यातील धोंडमाळ येथील रहिवासी गुलाब यशवंत भोये (४५) हे दुचाकीने (एमएच १५, बीएम ३३८६) जात होते़ पेठ चेक पोस्टजवळून जात असताना भोये यांच्या दुचाकीला टेम्पोने (एमएच १३, जी ५७११)ने धडक दिली़ यामध्ये भोये यांच्या डोक्यास व हातास गंभीर मार लागल्याने पेठ ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले़ या ठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, टेम्पोचालक आनंद भगत यास अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Death of a two-wheeler in the tempo shock