शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यात दहा बाधितांचा मृत्यू; २४ तासांत ३८८ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:54 IST

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी (दि. १५) महानगरात सात तर ग्रामीणमधील ३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३५९वर पोहोचली आहे. शिवाय दिवसभरात शहरात २२४ तर ग्रामीणमध्ये १६४ असे तब्बल ३८८ जण रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ७७६३ वर गेली.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी (दि. १५) महानगरात सात तर ग्रामीणमधील ३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३५९वर पोहोचली आहे. शिवाय दिवसभरात शहरात २२४ तर ग्रामीणमध्ये १६४ असे तब्बल ३८८ जण रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ७७६३ वर गेली.महानगरात बुधवारी पुन्हा एकदा बाधितांचा आकडा दोनशे पार होऊन तब्बल २२६पर्यंत पोहोचल्याने बाधितांच्या संख्येत प्रचंड मोठी भर पडल्याने यंत्रणेच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे.दरम्यान जिल्ह्णात नवीन दहा जणांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३५९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरातील १८८, मालेगाव शहरातील ७९, नाशिक ग्रामीणमधील ७८ तर जिल्हाबाह्य १४ मृतांचा समावेश आहे. दरम्यान एकीकडे नवीन संशयित दाखल होण्याचे प्रमाण वाढत असतानाच अहवालांचे प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील खूप वाढले आहे. बुधवारी तब्बल ८९१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित राहिले असून, प्रशासनाला त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.मालेगाव येथे २३ नवे बाधित आढळले आहेत. बाधितात चंदनपुरी, सोयगाव, जाजूवाडी, दरेगाव, कॅम्प, सायने बुद्रुक, संगमेश्वर, खाकुर्डी, अजंग येथील बाधितांचा समावेश आहे. सिन्नर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्याआहे.१०२८ नवीन संशयितजिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून बुधवारी एकूण १०२८ नवीन संशयित दाखल झाले आहेत. त्यात नाशिक मनपा रुग्णालयांमध्येच तब्बल ८१५, ग्रामीण रुग्णालयांमध्ये १४३, जिल्हा रुग्णालय ११, डॉ. पवार मेडिकल कॉलेज ११ आणि मालेगाव रुग्णालयातील ८ नवीन संशयितांचा समावेश आहे. एक हजारावर नवीन संशयित आढळून येण्याची ही घटना आठवडाभरात दुसऱ्यांदा घडली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू