निधन वार्ता
By Admin | Updated: October 25, 2016 00:59 IST2016-10-25T00:57:57+5:302016-10-25T00:59:19+5:30
निधन वार्ता

निधन वार्ता
खंडेराव होळकर
लासलगाव : येथील प्रगतिशील शेतकरी खंडेराव गंगाधर होळकर (८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, भावजयी, मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील बाळासाहेब होळकर व सुनील होळकर यांचे ते वडील होत.
विमलबाई बेनके
सप्तशृंगगड : येथील विमलबाई सुरेश बेनके (३६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. माजी उपसरपंच संदीप बेनके यांच्या त्या काकू होत.
शकुंतलाबाई लोया
ओझर : जानोरी येथील शकुंतलाबाई बद्रिनारायण लोया (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र लोया यांच्या त्या मोताश्री होत. रामदेवबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बद्रिनारायण लोया यांच्या त्या पत्नी होत.
मधुसूदन कुरुंभटी
नाशिक : मखमलाबाद नाका येथील रहिवासी मधुसूदन कुरुंभटी (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सीताबाई आव्हाड
नाशिक : ढंकाबे येथील सीताबाई कारभारी आव्हाड (९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. हिरामण आव्हाड यांच्या त्या मातोश्री होत.
जिजाबाई पाटील
नाशिक : सटाणा येथील जिजाबाई पांडुरंग पाटील (५७) यांचे हृदयविकाराने निधन झाले़ त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ नाशिक महानगरपालिकेचे अभियंता सुरेश धामणे यांच्या त्या भगिनी, तर परिवहन महामंडळातील वाहक सचिन पाटील यांच्या त्या मातोश्री होत़