कंटेनरच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू

By Admin | Updated: August 7, 2014 02:04 IST2014-08-07T01:04:41+5:302014-08-07T02:04:43+5:30

कंटेनरच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू

The death of the student by the container's shock | कंटेनरच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू

कंटेनरच्या धडकेने विद्यार्थ्याचा मृत्यू

 

नाशिकरोड : बिटको चौकात सायकलवरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यास पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने तो विद्यार्थी जागीच ठार झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेजिमेंटल प्लाझामागील गायकवाड मळा येथे राहणारा ओम कचेश्वर पवार (वय १४) हा के. जे. मेहता शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकतो. जेलरोड येथे क्लासवरून ओम पवार हा सायकलवरून घरी येत होता. बिटको चौकातच तो सायकलवरून जात असताना पाठीमागून येणारा व सिन्नरच्या दिशेने वळणारा कंटेनर (जीजे १५ वायवाय १५९८) याचा सायकलला धक्का लागल्याने तो खाली पडून मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. अपघातानंतर कंटेनरचालक गाडी सोडून पळून गेला.
या घटनेमुळे के. जे. मेहता शाळेत व गायकवाड मळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत ओम याच्या पश्चात आई-वडील व दोन लहान भाऊ असा परिवार आहे. ओमचे वडील के. जे. मेहता शाळेतच शिपाई म्हणून कामाला आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the student by the container's shock