सहकार महर्षी किसनलाल बोरा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:25 IST2020-07-28T14:24:29+5:302020-07-28T14:25:09+5:30
वणी : सहकार क्षेत्राबरोबर विविध संस्था उभारण्यात मोलाचे योगदान देणारे सहकार महर्षी किसनलाल बोरा (८६) यांचे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२८) खाजगी रु ग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

किसनलाल बोरा

वणी मर्चंट बँकेचे संस्थापक संचालक, कादवा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँके असोशिएशन संस्थापक चेअरमन, जेष्ठ नागरीक संघ अध्यक्ष, वणी ग्रामपालीका सदस्य, किसनलालजी बोरा एजुकेशन सोसायटीचे आद्य प्रवर्तक, वणी विभागीय दुध उत्पादक संघाचे संस्थापक चेअरमन अशी विविध पदे भुषिवताना अनेक होतकरु युवकांना रोजगार उपलब्ध करु न दिला. अनेकांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन केले. शैक्षणिक, सामाजीक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या महत्वपुर्ण योगदानामुळे त्यांच्या निधनामुळे वणी गाव व परिसरावर शोककळा पसरली आहे. वणीतील सर्व व्यवहार व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवुन मनोमन आदरांजली अर्पण करण्यात आली. राजकारण, समाजकारण याचा समन्वय साधत असताना सकल जैन समाजाचे आधारस्तंभ म्हणून काम करताना सामाजिक दृष्टीकोन ठेवुन सर्व समाजाच्या विकासासाठीची तळमळ अनेकांनी जवळुन पाहीली आहे . किसनलाल बोरा यांच्या निधनामुळे विकासपर्वाना ब्रेक लागणार आहे.