ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:41 PM2019-05-05T23:41:17+5:302019-05-05T23:43:02+5:30

चांदवड : चांदवडजवळ खैसवस्ती भागात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांवर ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात एका दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेतील मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

The death of robbery in the villagers' attack | ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोराचा मृत्यू

चांदवड येथील खैसवस्ती भागात याच घरावर दरोडेखोरांनी हल्ला केला यावेळी परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.

Next
ठळक मुद्देपाच जखमी : चांदवड तालुक्यात ग्रामस्थ व संशयितात झटापट

चांदवड : चांदवडजवळ खैसवस्ती भागात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांवर ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात एका दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेतील मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक वृत्त असे, चांदवडजवळ खैसवस्ती भागात डॉ. प्रकाश त्र्यंबक कबाडे यांच्या शेतात शनिवारी रात्री उशिरा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चार ते पाच दरोडेखोरांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
या हल्याच्या आवाजाने शेजारच्या वस्तीवरील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत एका दरोडेखोराचा मृत्यू
झाला. स्थानिकांनी मारहाण सुरू करताच अन्य चार दरोडेखोर पळून जाऊ लागले.  त्यावेळी त्यातील एकाला स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने पकडले असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रु ग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला अधिक उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आले. या हाणामारीत अन्य चार ते पाच जण जखमी झाले. संशयितासोबत झालेल्या झटापटीत खैसवस्ती परिसरातील चार ते पाच ग्रामस्थ जखमी झाले. त्यात नवनाथ कारभारी मोरे (३८), समाधान नवनाथ मोरे (१४), संतोष साहेबराव अहिरे (२६) , प्रकाश गंगाधर वाजदेव (३६)सर्व रा. खैसवस्ती यांचा समावेश आहे. २५ ते ३५ वयोगटातील संशयितांनी समाधान मोरे यास चाकुचा धाक दाखवत घराचा दरवाजा उघडायला सांगीत त्याच्यावर हल्ला केला. या झटापटीवेळी संबधितांनी मदतीसाठी आरडाओरड केला. आवाज एैकून परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले असता संशयितांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात तीन जण जखमी झाले. दरम्यानच्या काळात घटनेचे वृत्त समजताच खैसवाडा अदिवासी वस्तीवरील ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी अज्ञात चोरट्यांचा पाठलाग केला. या दरम्यान ग्रामस्थ व संशयीतांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी झालेल्या जोरदार हाणामारीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या एका संशयीताचा मृत्यू झाला. यावेळी एका संशयीतास नागरीकांनी पोलीसांच्या ताब्यात दिले. घटनेतील मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. घटनेत जखमी संशयिताच्या जवाबानंतर घटनेचा उलगडा होण्याचा विश्वास सुत्रांनी व्यक्त केला. या प्रकरणी नवनाथ कारभारी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदवड पोलीसांनी अनोळखी संशयीताच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या सहा महिन्यात याच घरावर दरोडा पडण्याची ही दुसरी वेळ असल्याची माहिती या घटनेतील जखमी असलेल्या नवनाथ मोरे यांची पत्नी नंदाबाई यांनी दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील करत आहेत.
पोलिसांपुढे गुन्हेगारी रोखण्याचे आव्हानचांदवड परिसर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने घडणाऱ्या विविध गुन्हे विषयक घटनांनी सर्वसामान्य नागरीकांनी चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चांदवड बसस्थानकावर दिवसाढवळ्या चालकाचा खून, मत्तेवाडी शिवारात पानी फाउण्डेशनचे कार्यकर्ते व आदिवासी बांधव यांच्यात झालेली हाणामारी, चेन स्नॅचिंग, दुचाकी वाहने चोरीस जाण्याचा घटना सातत्याने घडत असताना पोलिसांपुढे गुन्हेगारी नष्ट करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: The death of robbery in the villagers' attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.