पादचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 01:44 IST2015-05-25T01:44:02+5:302015-05-25T01:44:27+5:30

पादचाऱ्याचा मृत्यू

Death of the pedestrians | पादचाऱ्याचा मृत्यू

पादचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सातपूर गावाजवळील व्हिक्सर कंपनीच्या बसथांब्यासमोर शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़ भास्कर मुरलीधर दोंदे (रा़ अभियंतानगर, साईनिवास सोसायटी, सप्तशृंगी निवाससमोर, कामटवाडे) हे शनिवारी पहाटे व्हिक्सर कंपनीच्या बसथांब्यासमोरून रस्ता ओलांडत होते़ यावेळी नाशिककडून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच १२, एआर २७१३) त्यांना जोरदार धडक दिली़ यामध्ये त्यांचा मृत्यू झाला़ या अपघात प्रकरणी पोलिसांनी चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Death of the pedestrians