कैद्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू

By Admin | Updated: September 14, 2016 00:39 IST2016-09-14T00:39:10+5:302016-09-14T00:39:46+5:30

नाशिकरोड कारागृह : पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Death of one in jail | कैद्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू

कैद्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू

नाशिकरोड : वृद्ध कैद्याने टोपी न दिल्याचा राग येऊन दुसऱ्या कैद्याने विटांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १३) दुपारी घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने हाणामारीच्या गुन्ह्णात सचिन कन्हैया चावरे (३६) यास पाच महिन्यांची शिक्षा सुनावली असून तो मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय़, तर बलात्काराच्या गुन्ह्णात तान्हाजी मारुती माने (७०) हा वृद्ध जन्मठेपेची शिक्षा भोगत होता़ सोमवारी (दि़ १२) संशयित चावरे याने मानेकडे टोपी मागितली असता मानेने नकार दिला़ या गोष्टीचा राग येऊन चावरे याने कारागृहातील वीट मानेच्या डोक्यात मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Death of one in jail