नाशकात इंदिरानगरला तरुणाची, सातपूरला महिलेची आत्महत्या
By नामदेव भोर | Updated: April 9, 2023 15:32 IST2023-04-09T15:31:58+5:302023-04-09T15:32:46+5:30
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करी आहेत.

नाशकात इंदिरानगरला तरुणाची, सातपूरला महिलेची आत्महत्या
नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : इंदिरानगर परिसरात एका तरुणाने राहत्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.८) घडली असून सातपूरच्या श्रमीकनगर भागातही एका महिलेने गळफास लावून घेत स्वत:चे जीवन संपविल्याच्या घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा येथे पोलिस वसाहतीत शुभम भास्कर महाजन (२२) या तरुणाने राहत्या घरात हॉलमधील छताच्या पंख्याला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस हवालदार भालेराव या प्रकरणाचा अधिक तपास करी आहेत.
तर सातपूरला श्रमिकनगर वसाहतीत माळी कॉलनी येथे सरलाबाई पोपट भगत यांनी शनिवारी (दि.८) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राहत्या घरात कापडी फेट्याच्या साह्याने गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांचे पती पोपट चंद्रभान भगत यांनी त्यांना तत्काळ खाली उतरवून शासकिय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉ. पगार यांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणातही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नसून पोलिस या घटनांचा तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"